Fri, Apr 19, 2019 12:03होमपेज › Sangli › फळ पीक विमा योजनेत सहभागाचे आवाहन

फळ पीक विमा योजनेत सहभागाचे आवाहन

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 8:01PMसांगली : प्रतिनिधी

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजना (मृग बहार)   संत्रा, मोसंबी, डालिंब, पेरू व चिकू या  फळपिकांकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले आहे.त्यांनी निवेदनात म्हटले आहे,  बिगरकर्जदार, कर्जदार शेतकर्‍यांकरिता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत संत्रा, मोसंबी आणि पेरू या फळपिकांकरिता   14 जून, चिकू फळपिकांसाठी 30 जून आणि  डाळिंबासाठी  14 जुलैपर्यंत आहे. शेतकर्‍यांनी मुदतीत विमा हप्ता भरून लाभ घ्यावा.

सांगली जिल्ह्यात  पेरू आणि डाळिंब या फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी डाळिंब फळपिकासाठी 1 लाख 21 हजार रुपये तर पेरूसाठी 55 हजार रुपये आहे. शेतकर्‍यांनी संरक्षित रक्कमेच्या  5 टक्के प्रति हेक्टरी भरावयाचा विमा हप्ता डाळिंब पिकासाठी 6 हजार 50 रुपये आहे. पेरू पिकासाठी 2 हजार 750 रुपये आहे. डाळिंबासाठी  विमा संरक्षण कालावधी 15 जुलै ते 15 आक्टोंबर 2018 असा आहे.  याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.