Thu, Jul 18, 2019 21:18होमपेज › Sangli › आणखी ४३४४ शेतकर्‍यांना कर्जमाफी 

आणखी ४३४४ शेतकर्‍यांना कर्जमाफी 

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:34PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’साठी पात्र लाभार्थींची 4 हजार 344 शेतकर्‍यांची पाचवी ‘ग्रीनलिस्ट’ शुक्रवारी प्रसिद्ध झाली. जिल्हा बँकेला ही यादी प्राप्त झाली आहे. पाचव्या ग्रीन लिस्टमधील शेतकर्‍यांना 6 कोटी 50 लाखांचा लाभ मिळाला आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’ साठी जिल्ह्यातून 1.83 लाख शेतकर्‍यांनी (कुटुंबे) नोंदणी केली होती. यापूर्वी चार ‘ग्रीनलिस्ट’  जाहीर झालेल्या आहेत. या चार ग्रीनलिस्टमधील 91 हजार 192 शेतकर्‍यांना 187 कोटींचा लाभ मिळालेला आहे. 

दरम्यान चार ग्रीन लिस्टनंतर आलेल्या ‘यलोलिस्ट’मधील 21 हजार 324 शेतकर्‍यांपैकी 1861 तर ‘मिसमॅच-1’ व ‘मिसमॅच-2’ यादीतील 90 हजार शेतकर्‍यांपैकी 28 हजार शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरत आहेत. यलोलिस्ट, मिसमॅच 1, मिसमॅच 2 यादीतील 29 हजार 861 शेतकर्‍यांचे लक्ष पाचव्या ‘ग्रीनलिस्ट’कडे लागले आहे. पाचवी ग्रीनलिस्ट जाहीर झाली आहे. त्यामध्ये 4 हजार 344 शेतकर्‍यांचा समावेश आहे. उर्वरीत शेतकर्‍यांचे लक्ष आता सहाव्या ‘ग्रीनलिस्ट’कडे लागले आहे.