Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Sangli › आणखी २२ हजार शेतकर्‍यांना ६२ कोटी

आणखी २२ हजार शेतकर्‍यांना ६२ कोटी

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:14PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ‘ओटीएस’ लाभाची चौथी यादी बुधवारी जिल्हा बँकेच्या लॉगिनवर झळकली. जिल्ह्यात आणखी 22 हजार शेतकर्‍यांना सुमारे 62 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. एकूण चार टप्प्यात जिल्हा बँकेकडील 1 लाख 11 हजार 712 शेतकर्‍यांना सुमारे 282 कोटींचा लाभ होणार आहे. 

जिल्ह्यात मंगळवारअखेर तीन टप्प्यात 89 हजार 790 शेतकर्‍यांची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्हा बँकेच्या लॉगिनवर आली होती. या शेतकर्‍यांच्या लाभाची रक्कम 220 कोटी रुपये आहे. बुधवारी चौथ्या यादीत आणखी 21 हजार 922 शेतकर्‍यांची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्हा बँकेला आली आहे. चौथ्या यादीतील 4 हजार 438 शेतकर्‍यांचे 15 कोटी 59 लाख 14 हजार 853 रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. 15 हजार 965 शेतकर्‍यांना 23 कोटी 23 लाख 29 हजार 137 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजुर झाले आहे. याशिवाय 1 हजार 519 शेतकरी ओटीएस साठी पात्र ठरले आहेत. या शेतकर्‍यांनी दीडलाखावरील कर्ज दि. 31 मार्च 2018 पर्यंत भरल्यास त्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. 

कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानासाठी जिल्ह्यात तीन टप्प्यात 89 हजार 790 पात्र शेतकर्‍यांची ‘ग्रीन लिस्ट’ जिल्हा बँकेच्या लॉगिनवर आली आहे. यामध्ये कर्जमाफीस पात्र दीड लाखांपर्यंतचे थकबाकीदार शेतकरी 24 हजार 160 आहेेत. त्यांच्या कर्जमाफीची रक्कम 89.68 कोटी रुपये आहे. 59 हजार 898 शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र आहेत. त्यांची रक्कम 90.91 कोटी रुपये आहे. ‘ओटीसएस’साठी 5 हजार 739 शेतकरी पात्र आहेत त्यांनी दीड लाखावरील रक्कम 31 मार्च 2018 पर्यंत भरल्यास 39.42 कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.