होमपेज › Sangli › तासगावात अंनिसचा मॉर्निंग वॉक

तासगावात अंनिसचा मॉर्निंग वॉक

Published On: Aug 21 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 11:16PMतासगाव : शहर प्रतिनिधी

दिवंगत समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या 5 व्या स्मृतीदिना निमित्त तासगाव अंनिसने सिध्देश्वर चौक ते पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयापर्यंत विवेक मॉर्निग वॉक काढला.‘शहिदों के अरमानों को मंझिल तक पहुंचायेंगे’, अशा घोषणा देत हे या वॉकमध्ये शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मॉनिर्ंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या विवेकवाद्यांना कितीही गोळ्या घातल्या तरी आम्ही हा विवेकाचा मॉर्निग वॉक सोडणार नाही, असा संदेश यातून देण्यात आला.

प्रा. डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, अंनिस आणि समविचारी कार्यकत्यार्ंच्या मनामध्ये संताप आणि वेदना आहेत. डॉ.  दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांचा खून होऊन 5 वर्षे झाले तरी मारेकरी आणि सूत्रधार सापडत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच सापडलेल्या मारेकर्‍यांबाबत व्यवस्थित तपास करून तपास यंत्रणांनी सूत्रधारापर्यंत पोहोचावे.
अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जाधव, तालुका कार्याध्यक्ष अमर खोत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य फारूक गवंडी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दिल्लीत संविधान जाळणार्‍यांचा निषेध करण्यात आला. दाभोलकर व पानसरे यांच्या मारेकर्‍यांचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुनील ढाले यांना देण्यात आले.