Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Sangli › पशुधन नव्हे बावन्नकशी सोने

पशुधन नव्हे बावन्नकशी सोने

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:14PMदेशातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी पशुधनानेे महत्वाची  भूमिका बजावली आहे. ग्रामीण भागाचा चौफेर विकास साधण्यासाठी पाणलोट विकास,  जमीन,  वनस्पती, शेतकरी, शेतमजूर व पशुधन विकास महत्त्वाचा ठरला आहे.

जिल्ह्यात अपवाद वगळता बहुसंख्य शेतकरी  जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. गाय, म्हैस पालनातून दुग्धव्यवसाय उभा राहिला. कुक्कुटपालन, वराहपालन, मत्स्यपालन  आदि व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. किंबहुना पशुपालन हा आता अनेक शेतकर्‍यांसाठी मुख्य व्यवसाय  बनला आहे.

सांगली जिल्हा दूध व्यवसायात व उत्पादनात आज राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खासगी  दूधव्यवसायिकांमार्फत तसेच सहकारी दूध संघांमार्फत   दूध संकलन केले जाते. अनेक ठिकाणी गाई, म्हशींचे दूधव्यवसायासाठी अत्याधुनिक गोठे बांधण्यात आले आहेत. यातून शेतकर्‍यांना उत्पन्‍नाचा आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आहे.  विशेषत: जिल्ह्याच्या पूर्वभागात  शेळी- मेंढी पालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. बदलत्या काळात  जिल्ह्यात पशुधनाचे महत्त्व वाढले आहे. त्याच बरोबर पशुधन व्यवस्थापनासाठी देखील विशेषत: पशुसंवर्धन विभागाच्यावतीने मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे पशु- पक्ष्यांचे प्रदर्शन आयोजित करूनही पशुपालकांमध्ये जागृती केली जात आहे.

पाळीव जनावरांचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे ठरते. विशेषत: दुभत्या जनावरांचे आरोग्य प्रखर उन, सततचा वारा, सातत्याने होत असलेला पाऊस आदिंमुळे धोक्यात येऊ शकते. पाळीव जनावरे आजारी पडू नयेत यासाठी आता पावसाळ्याच्या तोंडावर पशुपालक, शेतकर्‍यांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

राहुल माने, आंधळी