Mon, May 25, 2020 19:09होमपेज › Sangli › मृतदेह तपासणीची अंतिम प्रक्रिया सुरू

मृतदेह तपासणीची अंतिम प्रक्रिया सुरू

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:54PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर सांगली पोलिसांनी कावळेसाद (आंबोली) येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. तो मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला आहे. या मृतदेहाचे शवविच्छेदन, डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. आता या मृतदेहाची अंतिम उत्तरीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे महाविद्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. त्याबाबतचा अहवाल सीआयडीला देण्यात येणार आहे. 

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेतवर थर्ड डिग्री वापरून त्याचा खून केला. त्यानंतर कावळेसाद येथे मृतदेह जाळला. ही घटना उघडकीस आल्यानंतर सांगली पोलिसांनी कावळेसाद येथे इन कॅमेरा पंचनामा करून मृतदेह मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणला. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनसाठी नमुने पाठविण्यात आले होते. त्यात तो मृतदेह अनिकेतचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. या अंतिम उत्तरीय तपासणीत अनेक प्रकारची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये हाडांना इजा झाली आहे का, हाडांवर काही जखमा आहेत का, इजा झाली असल्यास ती कशामुळे झाली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या अहवालाचे महत्व वाढणार आहे.