Thu, Jan 17, 2019 12:59होमपेज › Sangli › सीआयडी जबाब सुरूच

सीआयडी जबाब सुरूच

Published On: Dec 28 2017 1:27AM | Last Updated: Dec 27 2017 11:30PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने जबाब घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत 54 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्याशिवाय कॉल डिटेल्समध्ये ज्यांचे मोबाईल क्रमांक आले आहेत त्यांचेही जबाब घेण्याचे काम सुरू आहे. त्यावरूनच माईघाटावर बसलेल्या दोघांचा शोध सुरू असल्याचे सीआयडीच्या सुत्रांनी सांगितले. 

याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याचे साथीदार सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कामटेचा मामेसासरा बाळासाहेब कांबळे याचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अनिकेतचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी कामटेने अनेकांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. त्याने ज्यांच्याशी संपर्क साधला होता त्यांचे जबाब घेण्यात आले आहेत. 

त्याशिवाय अन्य संशयित पोलिसांचेही कॉलडिटेल्स काढण्यात आले आहेत. त्यांना फोन केलेल्यांचेही जबाब घेण्याचे काम सुरू आहे. कॉल डिटेल्सवरून नावे निष्पन्न होणार्‍यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.