Sat, Nov 17, 2018 14:15होमपेज › Sangli › कोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण

कोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 10 2017 11:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांकडून खून करण्यात आलेल्या अनिकेत कोथळेचे कुटुंबीय सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने सांगितले. 

दि. 6 नोव्हेंबरला रात्री कामटे आणि त्याच्या साथीदारांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेतवर थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे दोनदा जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समिती, कोथळे कुटुंबीय यांनी केलेल्या आंदोलनाची दखल शासनाकडून घेण्यात आली. शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्यात आली आहे. 

हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी या मागण्यांसाठी कोथळे कुटुंबियांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिला होता.