Fri, Apr 26, 2019 17:30होमपेज › Sangli › अनिकेत कोथळे खून प्रकरण : कामटेच्या सासर्‍याच्या जामिनावर आज सुनावणी

अनिकेत कोथळे खून प्रकरण : कामटेच्या सासर्‍याच्या जामिनावर आज सुनावणी

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 03 2018 12:02AMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी पुरवणी आरोपपत्र तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे. यामध्ये संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या मामेसासर्‍याने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.  

या प्रकऱणाचे आरोपपत्र दि. 5 फेब्रुवारीला सीआयडीतर्फे दाखल करण्यात आले आहे. अनिकेतचा कोठडीत खून केल्यानंतर त्याचा मृतदेह घेऊन शहरात फिरत असताना अमोल भंडारेला धरून बसलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. त्याशिवाय कामटेला मदत करणार्‍यांकडेही चौकशी सुरू आहे. त्यामुळे याप्रकरणात पुरवणी आरोपपत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावर आता दि. 5 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. 

या  प्रकरणातील संशयित कामटेचा मामेसासरा बाळासाहेब आप्पासाहेब कांबळे (वय 47) याने तीन दिवसांपूर्वी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.