Tue, Aug 20, 2019 04:06होमपेज › Sangli › नागजमध्ये विहिरीत अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळला

नागजमध्ये विहिरीत अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळला

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:36PM

बुकमार्क करा

नागज : वार्ताहर

नागज (ता.कवठेमहांकाळ) येथे एका विहिरीत गुरूवारी सकाळी एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह सडलेल्या स्थितीत आढळून आला आहे. सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे वयाच्या या  मृतदेहावर कपडे नसल्याने त्याची आत्महत्या की खून याबाबत घटनास्थळी चर्चा सुरू होती. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.

गाावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर नागज-किडेबिसरी रस्त्यालगत असलेल्या जगन्नाथ शंकर शिंदे  यांच्या विहिरीमध्ये गुरूवारी सकाळी एक मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिस पाटील दीपक शिंदे  यांनी या घटनेची  माहिती कवठेमहांकाळ  पोलिसांना दिली.

कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली.ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. शिंदे हे रविवारी विहिरीवरील  मोटार सुरू करायला गेले होते. तेव्हा विहिरीत मृतदेह नव्हता. त्यामुळे त्यानंतरच्या चार दिवसात ही घटना घडली असल्याचा संशय आहे. मृतदेहावर जखमा आहेत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड व पोलिस उपनिरीक्षक अजित भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे. अधिक तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात झाला आहे.