Fri, Jul 19, 2019 20:29होमपेज › Sangli › मनुस्मृतीच्या प्रतीचे दहन 

मनुस्मृतीच्या प्रतीचे दहन 

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मनुस्मृतीच्या  प्रतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला. एका पानाची प्रतही जाळली. पोलिसांनी त्यांना विरोध केला.त्यात कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात जोरदार झटापट झाली.

दरम्यान या झटापटीमध्ये सोनाली कांबळे या  कार्यकर्तीला चक्कर आली.त्यामुळे तातडीने त्यांना सिव्हील रुग्णालयात  दाखल करण्यात  आले. पोलिसांवर हात उचलल्याच्या कारणावरून आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सनातन  , शिवप्रतिष्ठान या संघटनांवर बंदी घाला आणि त्यांना देशद्रोही, आतंकवादी म्हणून घोषित करा या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने राज्यभर आज आंदोनाचे आयोजन केले होते. 
त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   दलित महासंघाचे सतीश मोहिते, उत्तम चांदने ,शंकर महापुरे , महादेव देवकुळे, उत्तम मोहिते आदि आंदोलक दुपारी बाराच्या  आले.त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.  संभाजी भिडे  यांच्यावर कारवाई करा,अशीही मागणी त्यांनी केली. 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनुस्मृतीच्या  प्रतीचे दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र  परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात जोरदार झटापट झाली. आंदोलकांनी त्यावेळी एका पानाचे दहन केले.

आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की आणि दमबाजी केली असे कारण देत  घोषणा दिल्या . आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठाण मांडले. त्यावेळी सोनाली कांबळे यांना चक्‍कर आली.    त्यांना तातडीने सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथून त्यांना एका खासगी दवाखान्यात दाखल केले असल्याचे सांगण्यात आले.   दरम्यान आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश तनपुरे  यांनी तातडीने  आंदोलनस्थळी धाव घेतली.आणखी पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. पोलिसांनी वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात त्यांना नेण्यात आले.