Sun, May 26, 2019 16:39होमपेज › Sangli › हळद, बेदाणा, मिरचीबाबत ‘जीएसटी’कडे अपील

हळद, बेदाणा, मिरचीबाबत ‘जीएसटी’कडे अपील

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 10:49PMसांगली : प्रतिनिधी

हळद, बेदाणा, मिरची या शेतीमालावर कोणत्या टप्प्यावर जीएसटी आकारणी करावी, यासंदर्भात जीएसटी कौन्सिलकडे अपील करण्याचा निर्णय सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ सभेत झाला. मिरजेत प्रस्तावित अत्याधुनिक फुलांच्या मार्केटला माजीमंत्री (स्व.) मदन पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. 

बाजार समितीत शुक्रवारी संचालक मंडळ सभा झाली. अध्यक्षस्थानी दिनकर पाटील होते. उपसभापती तानाजी पाटील, संचालक वसंतराव गायकवाड, अण्णासाहेब कोरे, प्रशांत शेजाळ, जीवन पाटील, कुमार पाटील, अभिजीत चव्हाण, रामगोंडा संती, दयगोेंडा बिरादार, बाळासाहेब बंडगर, दादासाहेब कोळेकर, उमेश पाटील, सुरेश पाटील, विठ्ठल निकम, जयश्री पाटील, मुजीर जांभळीकर, शितल पाटील, सचिव पी. एस. पाटील, उपसचिव एन. एम. हुल्याळकर उपस्थित होते. 

हळद, बेदाणा, मिरची या शेतीमालावरील जीएसटी प्रायमरी व्यापारावेळी न आकारता सेकंडरी व्यापारावेळी आकारावा, अशी मागणी आहे. त्याअनुषंगाने जीएसटी कौन्सिलकडे अपील करण्याचा निर्णय झाला. अपीलवर कौन्सिलकडून निर्णय झाल्यानंतर ‘जीएसटी’ आकारणीतील संभ्रमावस्था दूर होणार आहे. 

बेंगलोरच्या धर्तीवर फूल मार्केट

बेंगलोरच्या धर्तीवर मिरज दुय्यम बाजार आवारात अत्याधुनिक फुलांचे मार्केट तसेच फुलांसाठी कोल्डस्टोअरेज उभारले जाणार आहे. या फुल मार्केटला माजीमंत्री मदन पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय झाला. 

सांगली, मिरज, जत, क. महांकाळ बाजार आवारांसाठी 2 कोटी

सांगली मार्केट यार्ड, विष्णुअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केट तसेच मिरज, जत व कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवारात पायाभुत सुविधांसाठी 2.30 कोटी रुपये मंजूर. 
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत सांगली बाजार समितीस  1.27 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त. 
संचालक मंडळावरील रिक्त जागी विनोदिनी धैर्यशिलराव सावंत (सुसलाद, ता. जत) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जयश्री पाटील यांच्या हस्ते सत्कार. 

 

Tags : sangli, sangli news, turmeric, chilli, currant, GST,