Mon, Jun 17, 2019 02:13होमपेज › Sangli › जिल्ह्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’

जिल्ह्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 7:37PMसांगली : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गुरुवारी रात्री अचानक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन करण्यात आले. रात्री आठ ते अकराच्या दरम्यान केलेल्या या ऑपरेशनमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध, चौकशी करण्यात आली. यावेळी वॉरंटवरील तिघांना अटक करण्यात आली, तर पाहिजे असलेले, फरारी असलेल्या 22 जणांकडे चौकशी करण्यात आली. दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

अधीक्षक शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. जुगार, मटका अड्ड्यांवर छाप्यांसह व्हिडिओ गेमवरही त्यांनी कारवाई सुरू केली आहे. कलेक्शन फेम 14 पोलिसांच्या बदल्या मुख्यालयात करण्यात आल्या आहेत. एलसीबीतील अकार्यक्षम कर्मचार्‍यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. अधीक्षक शर्मा कारवाईची व्याप्ती हळूहळू वाढवत असल्याचे चित्र आहे.  गुरुवारी रात्री अचानक त्यांनी ऑल आऊट ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक, सर्व ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कर्मचारी रात्री तीन तास रस्त्यावर होते. या ऑपरेशनवर स्वतः अधीक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे लक्ष ठेवून होते. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार, कारागृहातून जामीनावर बाहेर आलेले, शिक्षा भोगून बाहेर आलेल्यांकडेही चौकशी करून तपासणी करण्यात आली.