Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Sangli › सांगली, कोल्हापूरच्या शेतीपंप जोडणी जूनअखेर पूर्ण करा

सांगली, कोल्हापूरच्या शेतीपंप जोडणी जूनअखेर पूर्ण करा

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:32PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित शेती पंप जोडणी त्वरित पूर्ण करावी या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील आमदारांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले. हिवाळी अधिवेशनादरम्यान, नागपुरात याबाबत चर्चा झाल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. श्री. बावनकुळे यांनी वीज कंपनीला जून 2018 अखेर सर्व जोडणी पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचे गाडगीळ म्हणाले. 

गाडगीळ म्हणाले, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे पाण्याची सोय आहे. परंतु शेतीपंपांच्या जोडण्या वीज कंपनीकडून प्रलंबित आहेत. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही विभागाकडून दखल घेतली जात नाही. यासाठीच सर्व आमदारांनी विधान सभेत हा प्रश्‍न लावून धरला.

त्यानुसार बुधवारी पश्चिम महाराष्ट्रमधील प्रलंबित शेती पंप जोडणीबाबत श्री. बावनकुळे यांनी बैठक घेतली. या बैठकीत सांगली  जिल्ह्यात नोव्हेंबरअखेर 16073 शेतीपंप जोडण्या प्रलंबित असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.