Sat, Sep 22, 2018 10:41होमपेज › Sangli › वरुणराजाच्या अवकृपेने ‘अग्रणी’कोरडीच

वरुणराजाच्या अवकृपेने ‘अग्रणी’कोरडीच

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 30 2018 9:00PMलिंगनूर : प्रवीण जगताप

वरुणराजाच्या अवकृपेने पावसाळा संपत आला तरी  अग्रणी नदी अद्याप कोरडी ठणठणीत पडली आहे. त्यामुळे अग्रणी नदी आणि नदीकाठच्या शिवाराची तहान आता भागवणार तरी कोण, असा  सवाल उपस्थित केला जात आहे. 

अग्रणी  खानापूर तालुक्यातून येते.  मळणगाव, शिरढोण, हिंगणगाव, धुळगावमार्गे पुढे कर्नाटकात जाते. पांडेगाव, शिरूर, खिळेगाव, संबर्गी, नांगनूर, तावशी, शिवणूर, अब्याळ, मसरगुप्पी, मुरगुंडी भागातून वाहते. कवठेमहांकाळ, कर्नाटकातील अथणी तालुक्यात हजारो हेक्टर  क्षेत्र या नदीकाठालगत आहे. जर लोकांनी पैसे भरले तर याच नदीवर कवठेमहांकाळ तालुक्यात बांधलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे म्हैसाळ योजनेच्या  आवर्तनातून भरून घेतले जातात.