Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Sangli › एजंट धीरज पाटील मलेशियात?

एजंट धीरज पाटील मलेशियात?

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 17 2017 12:01AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चार तरूणांची फसवणूक करणार्‍या पोलिपुत्र कौस्तुभ पवार याला बुधवारी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित एजंट धीरज पाटील अद्यापही फरारी आहे. फसवणूक झालेल्या युवकांच्या नातेवाईकांनी तगादा लावल्यानंतर तो मलेशियात गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला मात्र तो सापडला नाही. 

याप्रकरणी पेठ (ता. वाळवा) येथील नामदेव कुंभार यांनी दि. 5 डिसेंबरला फिर्याद दिली होती.दरम्यान त्या चारही तरूणाना बेकायदा वास्तव्याबाबत मलेशियन न्यायालयात तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मलेशियन पोलिसांनी या तरूणांना ताब्यात घेतल्यानंतर लगेचच पोलिसपुत्र कौस्तुभसह धीरज गायब झाला होता. 

सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर एक विशेष पथक त्याचा शोध घेत होते. बुधवारी त्याला अटक करण्यात आली. नामदेव कुंभार यांचा मेहुणा गुरुनाथ कुंभार, मोहन शिंदे, दीपक माने, समाधान धनगर या चौघांसह एकूण 15 युवकांना प्रत्येकी दीड लाख रूपये घेऊन मलेशियाला पाठविले होते. मात्र यातील चौघांना वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियन पोलिसांनी अटक केली होती.   

दरम्यान कौस्तुभकडे पोलिसांनी कसून चौकशी सुरू ठेवली आहे. तो मलेशियाला जाण्यासाठी इच्छुक असणार्‍या युवकांना शोधून आणत होता. त्यांच्याकडून पैसे घेऊन तो धीरजला देत होता. त्यानंतर ते दोघे मिळून युवकांना मलेशियाला पाठवत होते अशी माहिती त्याने दिल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले. दोघांचीही बँक खाती सील करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 

आज पोलिसांनी धीरज पाटील याच्या पाटणे प्लॉट येथील घरावर छापा टाकला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडेही सखोल चौकशी करण्यात आली मात्र त्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही.