Fri, Sep 21, 2018 05:56होमपेज › Sangli › आईच्या निधनानंतर दागिन्यांची रक्कम वृद्ध सेवाश्रमाला देणगी 

आईच्या निधनानंतर दागिन्यांची रक्कम वृद्ध सेवाश्रमाला देणगी 

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 9:05PMकुपवाड : वार्ताहर 

शेवंताबाई आण्णाप्पा मासाळ (रा.गव्हर्मेंट कॉलनी,  सांगली) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कन्येने  आईच्या दागिन्यांचे 1 लाख 40 हजार रुपये   येथील वृद्धसेवाश्रमाला देणगी म्हणून दिले.  ही रक्कम आश्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी स्वीकारली. 

आई- वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पैसे आणि दागिने यांची वाटणी केली जाते. मात्र त्याला मासाळ आणि माने कुटुंबीय अपवाद ठरले आहेत. शेवंताबाई यांच्या कन्या लताताई बाळासाहेब माने यांनी  आईची सेवा केली आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची स्मृति कायमस्वरूपी राहावी याकरिता दागिने मोडून त्यातून आलेली रक्कम वृध्दसेवाश्रमाला  देणगी दिली. उपाध्यक्ष फिलिफ मार्टिन, संचालक बाळासाहेब कर्नाळे, रेव्हरंड प्रकाश काळे, अशोक पाटील,  डॉ. उदय जगदाळे, व्यवस्थापिका सौ.रेखाताई माळी आणि मासाळ  व माने  कुटुंबीय उपस्थित होते.