Mon, Jun 17, 2019 14:15होमपेज › Sangli › भाजपला रोखण्यासाठी पुरोगामींनी एकत्र यावे

भाजपला रोखण्यासाठी पुरोगामींनी एकत्र यावे

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 10:32PMमिरज : प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणुकीत जनता दल (सेक्युलर) चांगले आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे.असे आवाहन  प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष माजी आमदार  प्रा. शरद पाटील यांनी येथे केले.

महापालिका निवडणुकीसाठी जनता दलाकडून निवडणूक लढवू इच्छिणार्‍या आणि समर्थन देणार्‍या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रा. पाटील यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली. मतदारांना भेटवस्तू तसेच अन्य अमिषे दाखवून भाजप सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. विविध पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी महापालिका निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे भाजपचा निवडणुकीत पराभव करणे गरजेचे आहे.

आम्ही मतदारांना भेटवस्तू देणार नाही. तसेच आमिषेही दाखवणार नाही. मात्र स्वच्छ चारित्र्यांचे चांगले उमेदवार देऊ . आम्ही महापालिकेच्या सर्व जागा लढविणार नसलो तरी समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची आमची तयारी आहे. असेही पाटील यांनी सांगितले. या बैठकीत महापालिका निवडणुकी संदर्भात निर्णय घेण्याचे व समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करण्याचे सर्व अधिकार प्रा. पाटील यांना देण्यात आले.

या बैठकीत माजी उपमहापौर मोहन जाधव, कॉ. अमृतराव सुर्यवंशी, पश्‍चिम महाराष्ट्र युवा जनता दलाचे अध्यक्ष अ‍ॅड. फैय्याज झारी, मिरज तालुकाध्यक्ष संजय ऐनापुरे,  नासीर सतारमेकर, साहेबुद्दीन मुजावर यांचीही भाषणे झाली. या सर्वांनी भाजपला महापालिकेत सत्तेवर येऊ  न देण्यासाठी आम्ही मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे आवाहन केले.यावेळी कॉ. अमृतराव सूर्यवंशी यांनी डाव्या व समाजवादी तसेच पुरोगामी चळवळीतील संघटनांनी जनता दलाच्या पाठीशी राहुन राजकारणामध्ये सक्रीय सहभाग घेऊन युतीचे सक्षम उमेदवारांना निवडून देण्यासाठी जनजागृती करुन सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.या बैठकीत कर्नाटकमध्ये सत्तेवर आलेल्या जनता दल काँग्रेस संयुक्त सरकारचा अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनता दलामधून भाजपमध्ये गेलेल्यांचाही निषेध करण्यात आला. बैठकीस शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.