Tue, Nov 20, 2018 01:49होमपेज › Sangli › अ‍ॅड.उज्ज्वल निकम आज सांगलीत

अ‍ॅड.उज्ज्वल निकम आज सांगलीत

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने दि. 5 फेब्रुवारीला न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू आहे. अधिकृतरित्या वकीलपत्र स्वीकारण्यासह सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम गुरुवारी सांगलीत येत आहेत.  हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याच्या सुनावणीसाठीही ते सांगलीत येणार 
आहेत.

दि. 6 नोव्हेंबररोजी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेवर थर्ड डिग्री वापरून त्याचा खून करण्यात आला होता. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी नंतर त्याचा मृतदेह कावळेसाद (आंबोली) येथे नेऊन दोनदा डिझेल टाकून जाळला होता. याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत सातजणांना अटक करण्यात आली आहे. ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

मार्चमध्ये याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाकडे हा खटला वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याचीही सुनावणी होणार आहे. त्याही सुनावणी उपस्थित रहाणार असल्याचे अ‍ॅड. निकम यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. 

Tags : Adv. Ujjwal Nikam,  today, Sangli, Sangli news,