Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Sangli › सांगलीत मराठा क्रांती मोर्चातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा सत्कार

सांगलीत मराठा क्रांती मोर्चातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा सत्कार

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:21PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

कोपर्डी येथील मराठा भगिनीच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या युक्तीवादामुळेच त्या प्रकरणातील संशयितांना फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. कोपर्डीच्या त्या भगिनीसह संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याने अ‍ॅड. निकम यांचा सांगली मराठा क्रांती मोर्चातर्फे सत्कार करण्यात आला. 

मिरजेतील एका कार्यक्रमासाठी अ‍ॅड. निकम शनिवारी सांगलीत आले होते. त्यावेळी सांगलीतील मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक तसेच कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. कोपर्डी प्रकरणातील संशयितांना फाशीची शिक्षा झाल्याने त्या भगिनीसह संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळाल्याची भावना यावेळी मोर्चाच्या आयोजकांनी व्यक्त केली. यावेळी विलासराव देसाई यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी रघुवीर चव्हाण, धनंजय शिंदे, पप्पू शिंदे, महादेव नलवडे, अशोकराव पाटील, किरण भुजुगडे, विजय धुमाळ, पंडित पाटील, धनवान देसाई, विनायक यादव, प्रकाश पवार, अनिकेत परब, संकेत परब, प्रसाद चव्हाण, विजय भोसले, नीना देसाई, गीतांजली देसाई, वैशाली भोसले आदी उपस्थित होते.