Sat, Jan 19, 2019 04:28होमपेज › Sangli › आष्ट्यात अतिरिक्‍त तहसील कार्यालय मंजूर

आष्ट्यात अतिरिक्‍त तहसील कार्यालय मंजूर

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 05 2018 12:39AMइस्लामपूर : वार्ताहर

आष्टा येथे अतिरिक्‍त तहसील कार्यालयास सोमवारी राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीने पदसंख्येसह  मंजुरी दिली. ही माहिती नगराध्यक्ष निशिकांत पाटील व भाजपचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली वचनपूर्ती केल्याचेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, गेली अनेक वर्षे आष्टा परिसरातील लोकांची स्वतंत्र तालुक्याची मागणी होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता पहिल्या टप्प्यात आष्टा येथे अतिरिक्‍त तहसील कार्यालय सुरू करण्यात येईल, अशी  घोषणा केली होती. तेव्हापासून त्यासाठी सातत्याने  पाठपुरावा सुरू होता.

पाटील म्हणाले, अतिरिक्त तहसील कार्यालय मंजुरीसाठी ना. चंद्रकांत पाटील  व ना. सदाभाऊ खोत यांनीही प्रयत्न केले. अखेर सोमवारी  उच्चस्तरीय समितीने पदसंख्येसह अतिरिक्त तहसील कार्यालयाला मंजुरी दिली.  हे कार्यालय लवकर सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाच्या या निर्णयाने आष्टा परिसरातील जनतेची गैरसोय दूर होणार आहे.