Thu, May 28, 2020 23:08होमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’साठी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न

‘म्हैसाळ’साठी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न

Published On: Mar 21 2018 1:43AM | Last Updated: Mar 20 2018 9:32PMमिरज : प्रतिनिधी

म्हैसाळ योजना सुरू करण्यासाठी खासदार संजय पाटील यांचे सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आमदार सुरेश खाडे यांंनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून मिरज पूर्वभागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी मागणीसाठी वेळोवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्र्रेसच्यावतीने कालव्यात भजन आंदोलन, लाक्षणिक उपोषण, मोटारसायकल रॅली, मोर्चा आणि रास्तारोको अशी  आंदोलने केली. परंतु शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतलेली नाही.

ते म्हणाले, आमदार खाडे यांनी म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मात्र खासदार पाटील यांनी शासनाकडे विविध पातळीवर प्रयत्न चालविले आहेत. म्हैसाळ योजनेची जुनी थकबाकी भागविण्यासाठी    शासनाकडे 50 कोटी रुपये मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नाला लवकरच यश मिळेल, असा दावाही आमटवणे यांनी  केला.म्हैसाळ पाण्यासाठी 
सोमवारपासून सलगरे-मिरज पदयात्रा काढण्यात येणार होती. परंतु जिल्हाधिकारी   कार्यालयात  मंगळवारी  बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे  पदयात्रा स्थगित करण्यात आली. बैठकीनंतर पदयात्रेबाबत  निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी  दिली. सलगरेमध्ये जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीतून रस्त्याचे काम मंजूर झाले. या कामाचेही उद्घाटन काम सुरू होण्यापूर्वी त्यांनी केले, असा आरोप सरपंच तानाजी पाटील यांनी केला.  बाळासाहेब होनमोरे, माजी सभापती खंडेराव जगताप, अण्णासाहेब कोरे इत्यादी उपस्थित होते.

Tags : Sangli, Sangli News, Acute, water, scarcity, created in Miraj