Thu, Jun 20, 2019 14:47होमपेज › Sangli › ‘एफआरपी’ तत्काळ जमा न केल्यास कारवाई

‘एफआरपी’ तत्काळ जमा न केल्यास कारवाई

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 17 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

दि. 31 मार्च 2018 अखेर गाळप झालेल्या उसाच्या ‘एफआरपी’ची रक्‍कम ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या खात्यांवर तत्काळ जमा करावी. त्याबाबतचा अहवाल दि. 23 एप्रिलपर्यंत सादर करावा; अन्यथा संंबंधित कारखान्यांवर ‘आरआरसी’ची (महसुली वसुली) कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस साखर आयुक्‍तांनी सोमवारी संबंधित कारखान्यांना काढली आहे. 

ऊस (नियंत्रण) आदेश 1966 मधील तरतुदीनुसार कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे 14 दिवसांत किमान ‘एफआरपी’प्रमाणे बिल ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना देणे प्रत्येक कारखान्यावर बंधनकारक आहे. कारखान्यास सन 2017-18 च्या हंगामातील थकीत ‘एफआरपी’ संबंधितांना तत्काळ द्यावीत; अन्यथा कारखान्याविरुद्ध 

कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सुचना सुनावणीवेळी संबंधित कारखान्यांना दिलेल्या होत्या. तथापि दि. 31 मार्च 2018 अखेरच्या ऊस दर देयबाकी अहवालानुसार ‘एफआरपी’ देयके थकीत असलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटिसा धाडल्या आहेत. 

‘एफआरपी’ थकबाकीची रक्कम संबंधित कारखान्यांनी ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावी. संबंधित कारखान्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पूर्ततेचा अहवाल साखर आयुक्त कार्यालयाकडे  सादर करावा. दि. 23 एप्रिल 2018 पर्यंत पूर्तता अहवाल सादर न केल्यास कारखान्यावर ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या तरतुदीनुसार रेव्हिन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी)ची कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटलेले आहे. 

‘राज्यभर अनेक कारखान्यांकडे ‘एफआरपी’ रक्कम थकीत आहे. साखरेचे दर पडले आहेत. साखरेच्या निर्यातीला सबसिडी द्यावी, शासनाने बफर स्टॉक करावा, अशी मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीजने केलेली आहे. त्याकडेही शासनाने गांभीर्याने पहावे, असे मत एका साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी व्यक्त केले. 

Tags : sangli, Action taken the FRP is not immediately deposited Sugar Commissioner issued noti