Sat, Aug 24, 2019 12:25होमपेज › Sangli › ईव्हीएमबाबत संभ्रम करणार्‍यांवर कारवाई

ईव्हीएमबाबत संभ्रम करणार्‍यांवर कारवाई

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 12 2018 1:03AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणूक निकालासंदर्भात  ईव्हीएम मशीनबाबत अपप्रचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश  शनिवारी मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्‍त रवींद्र खेबूडकर यांनी दिले. दरम्यान, ईव्हीएम मशीनबाबत गैरसमजातून तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारीचे निरसन झाल्याने आम्ही माघार घेत आहोत, असे निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

महापालिका  निवडणुकीसाठी  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी   उमेदवारांना चिन्हे वाटपबाबत दि. 18 जुलै रोजी तक्‍ता प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये निवडणूक निकालाच्या वेळी   आकडेमोड करून ती  जुलैची   आकडेमोड असल्याबाबत सोशल मीडियावर बेकायदेशीर प्रसिद्धी केली . त्याबाबतची तक्रार  अश्रफ वांकर  यांनी जिल्हाधिकारी  यांच्याकडे केली होती.तसेच  खेबूडकर यांच्याकडेही तक्रार केली होती.त्यावर आयुक्‍त खेबूडकर यांनी  आज बैठक घेतली. 

त्यावेळी वांकर, महेश खराडे, रविंद्र खराडे, सदाशिव पाटील आदि उपस्थित होते.   निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कुलकर्णी ,उपायुक्त   सुनील पवार हेही उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी दि. 18 जुलै रोजीची   मूळ कागदपत्रे सर्वाना दाखवली.  तक्रारारदारांना आयुक्तांचे हे म्हणणे पटले. त्यामुळे माहितीबाबत कोणतीही  तक्रार नसल्याचे कार्यकर्त्यांनी   सांगितले. याबाबत  आयुक्त  खेबुडकर म्हणाले,   बेकायदेशीर कृती करून निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण  करणे , जनसामान्यात निवडणूक प्रक्रियेबाबत चुकीची  प्रसिद्धी करणे आदि प्रकार करणार्‍यांवर फौजदारी दाखल करुन संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल. 

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान सहायक आयुक्‍त एस. व्ही. पाटील यांनी ईव्हीएम मशीनबाबत सोशल मीडियावर चुकीची प्रसिद्धी केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.