Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Sangli › बेकायदा वाळू उपसा प्रकरणी कारवाई

बेकायदा वाळू उपसा प्रकरणी कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तासगाव : शहर प्रतिनिधी

लांडघोल मळा येथे मंगळवारी सायंकाळी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी बेकायदा वाळू उपसा व वाहतुकीबद्दल दोघांवर कारवाई केली. यातील एकजण फरार झाला, तर एकाला त्यांनी पकडले.

सागर किरण धाबुगडे (रा. तासगाव) व बबलू उर्फ सुनील शंकर पाटील (रा. वरचे गल्‍ली, तासगाव) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यापैकी धाबुगडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

भोसले म्हणाले, मंगळवारी सायंकाळी भरदिवसा जुना सातारा रोड येथील येरळा नदीपात्रात वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याठिकाणी तासगाव मंडल अधिकार्‍यांच्या पथकाला पाठवले होते. मात्र काहीच सापडले नाही. 

नंतर  भोसले यांनी स्वतः नदीपात्रात जावून पाहणी केली असता लांडघोल मळा येथे बबलू पाटील याने प्रदीप पाटील यांच्या शेतात त्याची विना नंबरची पिकअप गाडी  लपवून ठेवली होती. शंका येऊ नये म्हणून त्यामध्ये द्राक्षांचे क्रेट भरून ठेवले होते. 

भोसले यांनी हे क्रेट काढून पाहिल्यानंतर त्याठिकाणी वाळू  उपसा करण्याचे साहित्य आढळून आले. त्याला दंड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर यापूर्वीचाही दंड त्याच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे भोसले म्हणाले.

दरम्यान, पाटील याच्यासोबत सागर धाबुगडे हाही वाळूउपसा करत होता. मात्र पथकाची चाहूल लागताच तो फरार झाला. त्सोमवारी बोरगाव (ता. तासगाव) येथील शशिकांत मधुकर पाटील यांचाही ट्रॅक्टर वाळूसह  सापडला. त्याच्यावर विसापूरच्या मंडल अधिकार्‍यांनी  गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात कोणी  विनापरवाना वाळू वाहतूक करताना सापडला तर कडक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार भोसले यांनी सांगितले.


  •