Mon, May 20, 2019 11:00होमपेज › Sangli › जिल्हा बँकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ लवकरच

जिल्हा बँकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ लवकरच

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:01AMसांगली : प्रतिनिधी

सांगली जिल्हा बँकेने राज्यात जिल्हा बँकांमध्ये ‘नंबर वन’ पटकावला आहे. हा ‘नंबर वन’ कायम ठेवण्यासाठी सन 2018-19 मध्ये थकबाकी वसुली, ठेववाढ, कर्ज वाटप, गुंतवणूक व एकूणच व्यवसाय वृद्धीसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली. 

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील उपस्थित होते. जिल्हा बँकेने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत सन 2017-18 मध्ये 73 कोटींचा ढोबळ नफा मिळविला आहे. आणखी दीड कोटींचा नफा वाढण्याची शक्यता आहे. बँकेचा नेट नफा 35 कोटींवर जाईल, असे संकेत मिळत आहेत. 

पाटील म्हणाले, सांगली जिल्हा बँकेने राज्यात जिल्हा बँकांमध्ये ‘नंबर वन’ पटकावला आहे. हा ‘नंबर वन’ कायम ठेवण्यासाठी बँकेला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी सज्ज आहेत. मार्च एन्ड जवळ आल्यानंतर थकबाकी वसुली, ठेववाढीसाठी जोराचे प्रयत्न सुरू होतात. पण यापुढे एप्रिलपासून थकबाकी वसुरी, ठेववाढ, कर्ज वाटप,  स्वनिधीची योग्य गुंतवणूक व एकूणच बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला जाणार आहे. महिनानिहाय आराखडा तयार केला जाणार आहे. 

बँकेच्या व्यवसायवाढीसाठी जे अधिकारी, कर्मचारी जास्त मेहनत घेतील त्यांना जादा प्रोत्साहनपर रक्कम द्यावी, विचार बँकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. प्रोत्साहनपर रकमेमुळे व्यवसायवृद्धीसाठी स्पर्धा लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

Tags : sangli news, Action Plan soon, District Bank, District bank president Diliprao Patil,