Thu, Jul 18, 2019 00:40होमपेज › Sangli › शाळगावजवळ अपघात; रायगावची महिला ठार

शाळगावजवळ अपघात; रायगावची महिला ठार

Published On: Mar 13 2018 11:04PM | Last Updated: Mar 13 2018 11:04PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील शाळगाव येथे एस.टी.बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन विमल उत्तम ढेकळे (वय 43, रा. रायगाव, ता. कडेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत कडेगाव पोलिस ठाण्यात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी उत्तम ढेकळे व त्यांच्या पत्नी विमल या रात्री मोटारसायकल वरून  रायगावकडे चालले होते.  कराडला निघालेल्या भरधाव वेगातील एस.टी.बसने मोटारसायकलला समोरून धडक दिली. उत्तम ढेकळे हे उडून एका बाजूला पडले, तर त्यांच्या पत्नी विमल या बसच्या चाकाखाली सापडल्या.  त्यांचा जागीच मृत्यू झाला.  पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी तपास करीत आहेत.