Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Sangli › ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ उपक्रम 

‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ उपक्रम 

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 11:54PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

माजी मंत्री (स्व.)आमदार डॉ.पतंगराव कदम यांची स्मृती जपण्यासाठी ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे .या उपक्रमातूनच   पलूस -कडेगाव तालुक्यांसह जिल्ह्यातील   शालेय  विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती  आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली .येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय  येथे शालेय विद्यार्थांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न  झाला.त्यावेळी आमदार डॉ.कदम बोलत होते.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम ,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव मोहिते,डॉ.जितेश कदम ,सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले उपस्थित होते .आमदार डॉ.कदम म्हणाले , डॉ.पतंगराव कदम यांचा  वाढदिवस वेगळ्या पद्धतीने करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता.त्यानुसार  वाढदिवसानिमित्त दि. 8 जानेवारीस लोकसहभागातून 3 लाख 25   हजार वह्या जमा झाल्या होत्या. त्या वह्यांचे वाटप त्यांच्या हस्ते  करण्याचा संकल्प होता.परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाले.त्या दुःखातून सावरत आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव ,पंढरीनाथ घाडगे ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे ,उपनगराध्यक्ष साजिद पाटील,सागर सुर्यवशी,मुसा इनामदार आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते ,विविध शाळांतील विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .

पुढील वर्षी 5 लाख वह्यांचे संकलन

आमदार डॉ. कदम म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी कडेगाव -पलूस मतदार संघाचा भरभरून विकास केला आहे. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी लोकसहभागातून यावर्षी सव्वातीन लाख  वह्यांचे संकलन केले होते.पुढील वर्षी  डॉ. कदम यांच्या जयंतीदिनी 5 लाख वह्यांचे संकलन करण्यात येणार आहे.