होमपेज › Sangli › विकास कामे, योजनांवर 700 कोटी खर्च

विकास कामे, योजनांवर 700 कोटी खर्च

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

केंद्र, राज्य शासन, ‘डीपीसी’, स्वीय निधीतून जिल्हा परिषदेला सन 2017-18 या वर्षात सुमारे 1350 कोटी रुपये उपलब्ध झाले. त्यापैकी विकास कामे व योजनांवर सुमारे 700 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पगार व  अन्य बाबींवरील खर्च जवळपास तितकाच आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, ब्रह्मदेव पडळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील तसेच खातेप्रमुख उपस्थित होते. 

पदाधिकारी - अधिकारी उपस्थितीत कामांचा ‘लेखा-जोखा’जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांच्या कारकिर्दीला दि. 21 मार्च रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षातील कामाचा लेखा-जोखा अध्यक्ष देशमुख यांनी पदाधिकारी-अधिकारी यांच्या उपस्थितीत मांडला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्याला चांगला निधी मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून योजना व विकास कामे प्रभावीपणे राबविली जात आहेत, असे देशमुख यांनी सांगितले. प्रधानमंत्री घरकुल व अन्य योजनांद्वारे 2019 पर्यंत जिल्हा बेघरमुक्त केला जाणार आहे. जि. प. सर्वसाधारण सभा दर तीन महिन्यात दोनदा घेण्याचा निर्णयही झाला.  

Tags : Sangli, Sangli News, 700 crore rupees, spent, development works, schemes