Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Sangli › ए. जे. नाईट रायडर्सची बाजी

ए. जे. नाईट रायडर्सची बाजी

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 8:30PMसांगली : प्रतिनिधी

पुढारी ग्रामीण क्रिकेट प्रीमिअर लीगच्या दुसर्‍या दिवशीचा सामना ए. जे. नाईट रायडर्स विरूद्ध राष्ट्रप्रेम वडगाव यांच्यात झाला. त्यामध्ये ए. जे. रायडर्संनी 136 धावा करीत सामना जिंकला. विज्ञान माने हा नाबाद 74 धावा करीत सामनावीर ठरला.राष्ट्रप्रेम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित 20 षटकात संघाने 8 बाद 132 धावा केल्या. यामध्ये जुबेर पठाण 32 धावा, शंतनू तांदळे व शुभम देवकर यांनी अनुक्रमे 20 व 21 धावा केल्या. यामध्ये ए. जे. च्या संघातील अक्षय पाटील व सागर पाठक यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. 

राष्ट्रप्रेमच्याच्या 132 धावांच्या उत्तरादाखल ए. जे. नाईट रायडर्सने 19 षटकात 2 गडी बाद आणि 136 धावा करीत सामना जिंकला. ए. जे. च्या विज्ञान माने याने नाबाद  74 धावा केल्या. प्रशांत कोरे नाबाद 37 धावा  केल्या.  विज्ञान माने यांना सामनावीर घोषित करण्यात आले. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पुढाकार घेतला. यामध्ये लीगचे अध्यक्ष सुहास बाबर, कार्याध्यक्ष सम्राट महाडिक, उपाध्यक्ष कमलाकर पाटील, सचिव विज्ञान माने, संचालक पृथ्वीराज पवार, आदिनाथ मगदूम, रणजित सावर्डेकर, जयंत टिकेकर, सुधीर सिंहासने, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब, संदीप औताडे, राकेश उबाळे, योगेश पवार, उदय पाटील, दिनेश उबाळे, प्रशांत जाधव, हर्षद माने तसेच स्पर्धेचे आधारस्तंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मोलाचे योगदान दिले आहे.