Sat, Apr 20, 2019 08:08होमपेज › Sangli › ८८ हजार शेतकर्‍यांना १८२ कोटी

८८ हजार शेतकर्‍यांना १८२ कोटी

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 11:56PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात 88 हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचा 182 कोटींचा लाभ मिळाला आहे. जिल्हा बँकेने ही रक्‍कम खात्यांवर वर्ग केली आहे. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसच्या माहितीत त्रुटी अथवा अपुर्‍या माहितीची यादी शासनाकडून येणार आहे. त्याकडे लक्ष लागले आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएससाठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी (कुटुंबे) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यांत शासनाने 87 हजार 523 शेतकर्‍यांना 182 कोटींचा लाभ दिला आहे. यामध्ये 25 हजार 428 शेतकर्‍यांची 90 कोटी 49 लाख रुपयांची कर्जमाफी झाली आहे. 62 हजार 95 शेतकर्‍यांना 91 कोटी 53 लाखांचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. एक ते चार टप्प्यांत 26 हजार 494 शेतकर्‍यांना ओटीएसअंतर्गत 188 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत दीड लाखावरील थकबाकीची रक्‍कम भरावी लागेल. दीड लाखावर थकबाकी भरल्यानंतर दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. दरम्यान, बँकांनी पुरविलेल्या कर्ज खात्याच्या माहितीतील त्रुटी तसेच शेतकर्‍यांच्या अर्जातील अपुरी माहिती याचा ताळमेळ शासनस्तरावर होऊ शकला नाही.