Wed, Jul 24, 2019 05:54होमपेज › Sangli › तीन रुग्णालयांना 75 हजारांचा दंड

तीन रुग्णालयांना 75 हजारांचा दंड

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 2:14AMसांगली : प्रतिनिधी

जैविक कचरा उघड्यावर टाकणार्‍या मिरजेतील दोन डॉक्टरांसह तीन रुग्णालयांकडून 75 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या आरोग्य विभागाने काल केली. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर जैविक कचरा टाकला जात असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे सातत्याने येत असतात. मात्र,  आजपर्यंत कारवाई झालेली नव्हती. आयुक्‍त खेबुडकर यांनी  या आधी वारंवार आढावा बैठकीत उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करा, असे आदेश दिले होते.

प्रभाग समिती तीन या कुपवाड क्षेत्रात जैविक कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी डॉ. विक्रमसिंह जाधव हॉस्पिटल,  कुलकर्णी नेत्र रुग्णालय, डॉ. अशोक कुलकर्णी हॉस्पिटल यांना प्रत्येकी 25हजार  प्रमाणे 7 5 हजार रुपये दंड  वसूल करण्यात आला. या हॉस्पीटलनी जैविक कचरा उघड्यावर टाकला होता. याबाबत आरोग्य विभागाकडे तक्रार आली होती.

ही कारवाई आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त  स्मृती पाटील   यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली.   डॉ.संजय कवठेकर, डॉ.रविंद्र ताटे,स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, अरविंद कुलकर्णी,विकास कांबळे,सिध्दांत ठोकळे या पथकाने ही कारवाई केली.