Wed, Mar 20, 2019 02:37होमपेज › Sangli › फोन कॉलवरून घातला ६८ हजारांना गंडा

फोन कॉलवरून घातला ६८ हजारांना गंडा

Published On: May 01 2018 1:27AM | Last Updated: May 01 2018 1:24AMइस्लामपूर : शहर वार्ताहर

फोनवरून क्रेडिट कार्डचा नंबर जाणून घेऊन एकाने इस्लामपुरातील बँक खात्यावरील 68 हजार रुपयांची रक्कम परस्पर लांबवली. महावीर बबन होरे (मूळ गाव वाळवा, सध्या रा. इस्लामपूर)  यांनी याप्रकरणी सोमवारी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, होरे यांनी एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला होता. त्यांना दि. 12 एप्रिलरोजी क्रेडिट कार्ड मिळाले होते. दरम्यान,  दि. 19 एप्रिलरोजी दुपारी त्यांना मोबाईलवरून कॉल आला होता.  बँकेतून बोलत असल्याचे सांगत ‘क्रेडिट कार्ड मिळाले का?’ अशी विचारणा समोरच्या व्यक्तीने केली. त्यावेळी होरे यांनी आठवड्यापूर्वी कार्ड मिळाल्याचे सांगितले. कार्डवरील 16 अंकी नंबरही मोरे यांनी सांगितला. सीव्हीव्ही नंबरची मागणी फोनवरील व्यक्तीने केली. मात्र होरे यांना शंका आल्याने त्यांनी तो नंबर त्यांनी दिला नाही. 

त्या व्यक्तीने सीव्हीव्ही नंबर मोबाईल की पॅडवर  प्रेस करण्यास सांगितला. होरे यांनी सीव्हीव्ही नंबर टाईप केला. त्यावेळी फोनवर  बोलणे सुरू असतानाच मुंबई येथील एका खात्यावर  9 हजार 873 व  58 हजार 73 अशी एकूण 67 हजार 946 रुपयांची रक्कम ट्रान्सफर झाल्याचे मेसेज मोरे यांच्या मोबाईलवर आले.