Fri, Jul 19, 2019 01:11होमपेज › Sangli › मुक्तसंचार गोठ्यासाठी 60 लाखांची तरतूद

मुक्तसंचार गोठ्यासाठी 60 लाखांची तरतूद

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 25 2018 8:10PMसांगली : प्रतिनिधी

मुक्तसंचार गोठ्यांमुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. पशुपालकांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे. सन 2018-19 मध्येही मुक्त संचार गोठा अनुदान योजनेसाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुहास बाबर यांनी दिली. जिल्हा परिषदेत गुरूवारी पशुसंवर्धन समिती सभा झाली. उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन समिती सभापती सुहास बाबर अध्यक्षस्थानी होते. समितीचे सदस्य तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. टी. सावंत, पशुसंवर्धन उपायुक्त, पशुधन विकास अधिकारी,अग्रणी बँक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना बाबर म्हणाले, मुक्त संचार गोठा योजनेला शासनाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 84 पैकी 70 मुक्तसंचार गोठ्यांचे काम अतिशय उत्कृष्ट आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. ही योजना सन 2018-19 या वर्षीसाठीही चालू ठेवली जाणार आहे. त्यासाठी 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. 

विशेष घटक योजनेेंतर्गत शासनाकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली आहे. 70 लाख रुपये दुधाळ जनावरे व 30 लाख रुपये शेळी गट व वाटप अनुदानासाठी खर्च केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबर यांनी केले.खानापूर तालुक्यातील माहुली, घानवड, आळसंद, पारे, खानापूर, भाळवणी या पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. या पशुवैद्यकीय दवाखान्यांतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी करण्यात आला.