Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Sangli › नोकरीच्या आमिषाने तरुणास 5 लाखांना गंडा

नोकरीच्या आमिषाने तरुणास 5 लाखांना गंडा

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 30 2018 12:33AMमिरज : शहर प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोकरी देतो, अशी बतावणी करून पाच लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी प्रकाश पाटील (रा. सांगली) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत फसवणूक झालेल्या कुमार वसंत पाटील या तरुणाने तक्रार दिली आहे.

कुमार याच्या दिवंगत काकांचा मित्र आहे, असे सांगून प्रकाश पाटील हा कुमारकडे गेला होता. ‘तुला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावतो,’ असे सांगून त्याच्याकडून 2015 मध्ये पाच लाख रुपये, एक मोबाईल व दुचाकी घेतली. नोकरीही लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे कुमार याने बुधवारी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रकाश याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.