Wed, Jul 24, 2019 07:50होमपेज › Sangli › ४१ हजार शेतकर्‍यांना १०९ कोटी

४१ हजार शेतकर्‍यांना १०९ कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात दुसर्‍या टप्प्यात 40 हजार 859 शेतकर्‍यांना 108 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ झाला आहे. थकबाकीदार 19 हजार 774 शेतकर्‍यांचे 72.19 कोटी रुपये कर्जमाफ झाले आहे. नियमित कर्ज फेडलेल्या 21 हजार 85 शेतकर्‍यांना 36.39 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 

कर्जमाफीचे 72.19 कोटी रुपये जिल्हा बँकेत आले असून संबंधित शेतकर्‍यांची कर्जखाती कर्जमुक्‍त केली जात आहेत. प्रोत्साहन अनुदानाची रक्‍कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 

पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेकडील 1 हजार 346 शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी 6.52 कोटी रुपये आले होते. 

72 कोटी जिल्हा बँकेत

दुसर्‍या टप्प्यात 19 हजार 774 शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे 72.19 कोटी रुपये जिल्हा बँकेत आले आहेत. यामध्ये पुनर्गठीत कर्जमाफीची रक्‍कम 14.59 लाख रुपये आहे. 72.04 कोटी रुपये ही दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची रक्‍कम आहे.  

कर्जमाफीत जत, तासगाव आघाडीवर

दुसर्‍या टप्प्यातील कर्जमाफीमध्ये जत आणि तासगाव तालुक्याची आघाडी आहे. जत तालुक्यातील 4 हजार 668 शेतकर्‍यांचे 19.81 कोटी रुपये कर्ज माफ झाले आहे.  तासगाव तालुक्यातील 4 हजार 803 शेतकर्‍यांचे 18.56 कोटींचे कर्ज माफ झाले आहे. 

कर्जफेडीत वाळवा आघाडीवर

नियमित कर्ज  फेड केलेल्या शेतकर्‍यांना 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील 21 हजार 85 शेतकर्‍यांना 36.39 कोटी रुपये प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले आहे. त्यामध्ये वाळवा तालुक्यातील सर्वाधिक 6 हजार 844 शेतकर्‍यांना 11.10 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.