Mon, Jun 24, 2019 21:00होमपेज › Sangli › अपक्ष महाआघाडीतून 40 जण रिंगणात

अपक्ष महाआघाडीतून 40 जण रिंगणात

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 19 2018 12:06AMसांगली : प्रतिनिधी

सर्वपक्षीय बंडखोरांनी बंडाचा झेंडा फडकवत आता अपक्ष विकास महाआघाडीची बुधवारी घोषणा केली. त्यानुसार पहिली 40 जणांची यादी जाहीर केली. आणखी तब्बल 180 हून अधिक अपक्ष मैदानात आहेत. त्यांच्याशी चर्चेने पॅनेल करीत पुरवणी यादी जाहीर करणार असल्याचे आघाडीचे नेते नगरसेवक राजेश नाईक व स्वाभिमानी विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, अश्रफ वांकर यांनी सांगितले.

नाईक म्हणाले,  भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह प्रमुख पक्षांनी निष्ठावंतांना डावलून उमेदवारीचा बाजार केला केला. त्याविरोधात आम्ही बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वाभिमानीचे नेते खासदार राजू शेट्टी आमच्या पाठीशी आहेत.  आम्ही अपक्ष विकास महाआघाडीच्या माध्यमातून एकच चिन्हाची मागणी केली   होती. मात्र निवडणूक आयोगाने एकच चिन्ह नाकारले. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. तरीही आम्ही सर्वजण ताकदीने ही निवडणूक लढवू. 

खराडे म्हणाले, पहिल्या टप्प्यात आम्ही सर्वच प्रभागांतून पॅनेल तसेच स्वतंत्र असे 40 उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये आजी-माजी नगरसेवक-नगरसेविकांसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. आणखी अनेक अपक्ष संपर्कात आणि मैदानातही आहेत. आम्ही त्यांच्याशी समन्वयाने सर्वच प्रभागात पॅनेलची मोर्चेबांधणी करणार आहोत. यातून  आता आमची ताकद सर्वच पक्षांना दाखवू.