Sun, Feb 24, 2019 01:08होमपेज › Sangli › सांगलीत बँक ऑफ इंडियाची फसवणूक

सांगलीत बँक ऑफ इंडियाची फसवणूक

Published On: Mar 15 2018 1:27AM | Last Updated: Mar 15 2018 2:11PMसांगली : प्रतिनिधी

भडंग मशीन खरेदीच्या नावाखाली बँक ऑफ इंडियाकडून चार लाखांचे कर्ज घेतले. मात्र, प्रत्यक्षात मशीनच खरेदी न केल्याने सांगलीवाडीच्या एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

छाया शिवाजी निळे (रा. सांगलीवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापक सतीश मधुकर मोहोळ यांनी फिर्याद दिली आहे. छाया निळे यांनी भडंग मशीन खरेदी करण्यासाठी शासनाच्या योजनेतून बँक ऑफ इंडियाकडून 4 लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी दि. 30 मार्च 2017 रोजी अर्ज केला होता. त्यानुसार निळे यांना चार लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते. मात्र, निळे यांनी या रकमेतून भडंग मशीन खरेदी केली नाही. बँकेकडून कर्जाऊ घेतलेली रक्‍कम निळे यांनी वैयक्‍तिक कामासाठी खर्च केली.  दरम्यान, निळे यांनी बँकेला खोटी कागदपत्रे दिल्याचेही समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मोहोळ यांनी निळे यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, निळे यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आली नाही. या करणाचा तपास पोलिस हवालदार राजेंद्र रेळेकर करीत आहेत.