होमपेज › Sangli › विटा : कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद (video)

विटा : कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद (video)

Published On: Jan 28 2018 3:13PM | Last Updated: Jan 28 2018 3:17PMविटा : विजय लाळे 

       माणूस मारणारे ते लोक कोण होते...    सत्यास जाळणारे ते लोक कोण होते....     मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते....!

महाराष्ट्रातल्या कोरेगाव भीमा प्रकरणावर अशा ज्वलंत शब्दांत गझलकार डॉ. अविनाश संगोलकर यांनी विट्याच्या कवी संमेलनात सद्यस्थितीवर भाष्य केले. येथील भारतमाता ज्ञानपीठ आणि राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या वतीने आयोजित ३६ व्या ग्रामीण मराठी साहित्य सम्मेलनाच्या पहिल्या सत्रातील कविसंमेलनात सुमारे ५० कवींनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. सांगोलकर या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते, तर स्वागताध्यक्ष मोहनराव कदम, माधुरी कदम, उपस्थित होते, यावेळी कवींनी सादर केलेल्या प्रेम , स्त्री भ्रूण हत्या, देशभक्तीपर, विनोदी,राजकीय व विडंबनात्मक कवितांना विशेष दाद मिळाली

प्रारंभी प्रस्ताविक योगेश्वर मेटकरी यांनी तर स्वागत रघुराज मेटकरी यांनी केले, सरस्वती पूजन बाळकृष्ण चव्हाण, कविता चव्हाण, यांच्या हस्ते झाले, सुधीर इनामदार, प्रा. विश्वनाथ गायकवाड, चंद्रकांत देशमुखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती,गेली ३६ वर्षे विट्यासारख्या ग्रामीण भागात या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवसाहित्यिक तयार केले जात असल्याबद्दल डॉ.संगोलकर यांनी समाधान व्यक्त केले

या कवी संमेलनात सुमंत सगरे, राजाजी महाराज, अशोक ताटपूजे, साक्षी जाधव, शंकर कांबळे, शकुंतला  होनमाने, संदीप शितोळे, नीता वीर, डॉ. प्रकाश जाधव, बबूताई गावडे, हर्षवर्धन मेटकरी, प्रभाकर पाटील, वृषाली कुलकर्णी, दिपाली घाडगे, गौरी बागलकोटे, पृथ्वीराज भिंगारदेवें, सुभद्रा गायकवाड, सुवर्णा माळी, शबाना मुल्ला, निशा वायदंडे, संजय नायकवडी, भीमराव कुंभार, नितीन गवळी, अनिल तावरे, अल्ताफ हुसेन मुजावर, शारदा कदम, विठ्ठल भागवत, चंद्रकांत देशमुख, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुधाकर महामुनी, वीर राहुल, चंद्रकांत बल्लाळ, चांद्रवर्धन लांडगे, चांद्रकांत कान्हेरे, अमर गंगथडे , नवनाथ आडे, कृष्णा काळे, प्रा. दिनकर जगदाळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, अर्चना लाड, शाहीर पाटील, बाबुराव शेळके, दयासागर बन्नने, नामदेव भोसले, गौतम कांबळे, डॉ. अंजली रसाळ, देविका दिवटे, प्राची मेटकरी, दादा सावंत, स्वाती शिंदे-पवार, आदी कवींनी कविता सादर केल्या