Wed, Aug 21, 2019 19:32होमपेज › Sangli › रिक्त पदांवर 312 शिक्षकांच्या बदल्या

रिक्त पदांवर 312 शिक्षकांच्या बदल्या

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 7:41PMसांगली : प्रतिनिधी

शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणासाठी रिक्त ठेवायच्या पदांवर 312 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांना समानीकरणाच्या पदावरून ‘रिकॉल’ केले जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. जत, आटपाडी व अन्य काही तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त पदांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे सर्व तालुक्यात रिक्त पदांचे प्रमाण समान ठेवण्यासाठी ‘समानीकरणा’चा निर्णय झाला. रिक्त ठेवायच्या शाळा आणि शिक्षक पदसंख्याही निश्‍चित करण्यात आलेली  आहे. 

मात्र राज्यस्तरावरून झालेल्या जिल्हांतर्गत बदल्यांमधून समानीकरणासाठी रिक्त ठेवायच्या पदांवर 312 शिक्षकांची बदली झाली आहे. जिल्हा परिषदेने त्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. समानीकरणासाठी रिक्त ठेवायच्या पदांवर बदली झालेल्या शिक्षकांना परत बोलावले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

‘ ते’ 5 शिक्षक आयडेंटीफाय

आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत भाग घेऊ नये असे सूचित केले होते. तरिही 5 शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सहभागी होऊन बदलीचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे.