Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Sangli › प्लास्टिकबंदीबाबत शिथिलता 3 महिनेच

प्लास्टिकबंदीबाबत शिथिलता 3 महिनेच

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:37PMसांगली : प्रतिनिधी

प्लास्टिकबंदी कोणत्याही स्थितीत मागे घेतली जाणार नाही. किरकोळ वस्तू विक्री करणार्‍या दुकानदारांना ठराविक अटींवर केवळ तीन महिन्यांसाठी शिथिलता दिली आहे. त्यानंतर पुन्हा बंदीची कडक अंमलबजावणी केली जाईल,  अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. दरम्यान, सध्या जे विविध प्रकारचे प्लास्टिक राज्यात येत आहे, त्यात 80 टक्के वाटा हा गुजरात राज्यातील व्यापार्‍यांचा आहे. त्यांच्यावर सक्‍त कारवाई करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, प्लास्टिक हे  पर्यावरणाला घातक आहे. हा भस्मासुर आपण गाडलाच पाहिजे.  याचे महत्त्व सर्वांनाच कळाले आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्याचा निर्णय जागतिक पातळीवर झाला आहे. त्यानुसार जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, त्या आधीच महाराष्ट्र सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. या बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली. त्याची दखल इंग्लंडमध्येही घेण्यात आली आहे. ते म्हणाले, कोणत्याही स्थितीत प्लास्टिक वाढले जाणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. प्लास्टिकबंदीमुळे काहींना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लवकर विघटित होणारा पर्याय उपलब्ध होईपर्यंत प्लास्टिकबंदीला शिथिलता देण्यात आली आहे.त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही. प्लास्टिकबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत.