Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Sangli › मोरबगीत ३ लाखांचा गांजा जप्त

मोरबगीत ३ लाखांचा गांजा जप्त

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 10:11PM

बुकमार्क करा

उमदी : वार्ताहर

मोरबगी (ता. जत) येथील निलाप्पा अर्जुन कारकल यांच्या मक्याच्या शेतात लागवड केलेला 2 लाख 98 हजारांचा 54 किलो 800 ग्रॅम गांजा उमदी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. 

मोरबगी येथील गांज्याची लागवड केली असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक  प्रवीण सपांगे व पोलिस यांच्या पथकाने गांजाच्या शेतात छापा टाकून 2 ते 5 फूट उंचीची हिरवी व ओलसर गांजाची झाडे जप्त केली. त्यांचे वजन 50 किलो ग्रॅम आहे. बाजारभावाने त्याची अंदाजे किंमत अडीच लाख  व वाळलेल्या झाडांची किंमत 48000 रुपये आहे.