Thu, Jul 18, 2019 21:53होमपेज › Sangli › शिराळ्यात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण

शिराळ्यात स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण

Published On: Sep 09 2018 2:14AM | Last Updated: Sep 09 2018 2:14AMशिराळा : प्रतिनिधी 

येथे स्वाईन फ्लूचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आरोग्य विभागाकडून या रुग्णांच्या परिसरातील नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच शहरातही सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, एका महिलेस ताप आला. खासगी दवाखान्यात उपचार केले. मात्र, तब्येतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तपासणीत स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्‍न झाले.

या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन दहा वर्षांखालील मुलांमध्येही स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून आली. त्यांनाही कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहेत. या महिलेच्या घराजवळच्या वीस घरांतील नागरिकांचे  संपूर्ण सर्वेक्षण सुरू आहे. तसेच शहरातही सर्वेक्षण तातडीने सुरू करण्यात येणार आहे, असे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी.पवार यांनी सांगितले. 

ताप, सर्दीसाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच सर्वेक्षणासाठी येणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती द्यावी असे अवाहन डॉ. विलास रावळ व डॉ. अनिरुद्ध काकडे यांनी केले आहे.