Tue, Apr 23, 2019 08:05होमपेज › Sangli › ‘पशुसंवर्धन’ला ‘डीपीसी’तून ३.५५ कोटी मंजूर

‘पशुसंवर्धन’ला ‘डीपीसी’तून ३.५५ कोटी मंजूर

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला जिल्हा नियोजन समितीने 3.55 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पशुवैद्यकिय दवाखाने बांधकाम, पोल्ट्री, कामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती सुहास बाबर यांनी दिली. 

जिल्हा परिषदेत गुरूवारी पशुसंवर्धन समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सुहास बाबर होते. सदस्य अरूण बालटे, महादेव दुधाळ, मायावती कांबळे, भगवान वाघमारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. टी. सावंत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते उपस्थित होते. 

‘डीपीसी’तून सन 2018-19 साठी 3.55 कोटींची तरतूद झाली आहे. पाच पशुवैद्यकीय दवाखाने इमारत बांधकामासाठी 2.50 कोटी रुपये मंजूर आहेत. कामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी 32 गावे निवडली जाणार आहेत. या गावात जंतनाशक शिबिरे, गोचिडनाशक शिबिरे, शेतकरी सहल, प्रचार व प्रसिद्धी, नाविण्यपूर्ण योजनांसह एकूण 12 उपक्रमांसाठी 50 लाखांची तरतूद आहे. प्रत्येक गावाला 1 लाख 52 हजार 500 रुपयांची तरतूद आहे. सन 2017-18 अखेर जिल्ह्यात 364 गावात कामधेनू दत्तक ग्राम योजना राबविण्यात आलेली आहे.

शेतकरी उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेंतर्गत दि. 2 मे रोजी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुग्धव्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन, प्रचार, प्रसिद्धी केली जाणार आहे. प्रगतिशील पशुपालकांचा सन्मान केला जाणार आहेे. जिल्ह्यात 102 पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये दि. 2 मे रोजी रोगनिदान शिबिर आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती बाबर यांनी दिली. 

Tags : sangli, sangli news, 3.55 crore sanctioned, Animal Enhancement, DPC,