Mon, Apr 22, 2019 12:26होमपेज › Sangli › मिरजेत २५ लाखांची फसवणूक 

मिरजेत २५ लाखांची फसवणूक 

Published On: Feb 01 2018 1:38AM | Last Updated: Jan 31 2018 11:45PMमिरज : शहर प्रतिनिधी

सांगलीत विश्रामबाग परिसरात चार बंगले देतो, असे खोटे सांगून 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील सहा जणांवर मिरज शहर पोलिसांत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजित दिलीप कुलकर्णी (रा.गाडवे चौक, मिरज), सचिन भालचंद्र चौधरी (रा. नांद्रे), कय्युम रफिक मणेर (रा. वेताळनगर, मिरज), उदय गणमुखी (रा. इचलकरंजी), इर्शाद मुल्ला (रा. दत्तनगर, मिरज), सचिन पाटील (रा. हातकणंगले जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत मुश्ताक अब्दुलसत्तार सतारमेकर (वय 73, रा. शनिवार पेठ, मिरज) यांनी तक्रार दिली आहे. मुस्ताक व त्यांचा भाऊ यांनी 2011 मध्ये पंचवीस लाख रुपयांना जमीन विकली होती. त्यांच्याकडे पंचवीस लाख रुपये असल्याची माहिती काहींना मिळाली होती. त्या पंचवीस लाख रुपयांच्या मोबदल्यात चार बंगले विश्रामबाग येथील वृंदावन सोसायटीमध्ये देऊ, असे आश्‍वासन त्यांनी  दिले.

ठरल्याप्रमाणे त्या सर्वांनी सतारमेकर यांच्याकडून पंचवीस लाख रुपये घेतले. मात्र त्यांना बंगले दिले नाहीत. काही महिन्यांनंतर सतारमेकर यांनी त्यांना विचारल्यानंतर बंगल्यांची स्कीम बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. तुमचे पंचवीस लाख शेअर मार्केटमध्ये गुंतवले आहेत. त्यानुसार त्याचा मोबदला तुम्हाला दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. शेअरबाजारातील मोबदला म्हणून त्यांनी जुलै 2011 पर्यंत दोन लाख सत्तर हजार रुपये दिले. त्यानंतर प्रत्येकी तीन लाख रुपयांचे  पाच धनादेश दिले. मात्र ते  न वटल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने सतारमेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.