Sat, Feb 16, 2019 12:42होमपेज › Sangli › शिगावात २५ किलो गांजा जप्त

शिगावात २५ किलो गांजा जप्त

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 11:46PMसांगली : प्रतिनिधी

शिगाव (ता. वाळवा) येथे एका शेतात लावलेली गांजाची पंधरा झाडे जप्त करण्यात आली.  92 हजार रूपये किंमतीचा 25 किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी जगन्नाथ विठू गावडे (वय 38, रा. शिगाव) याला अटक कऱण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सोमवारी दुपारी ही कारवाई केली. याबाबत आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांना शिगावमध्ये गावडेने शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी पथकाने शिगाव येथील त्याच्या शेतात छापा टाकला. तेथे गांजाची पंधरा झाडे आढळून आली. त्यांचे वजन 25 किलो आहे. बाजारात त्याची किंमत 92 हजार रूपये असल्याचे सांगण्यात आले. निरीक्षक माने, आष्ट्याचे पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.  

Tags : sangli, Shigaon, 25 kg ganja seized, sangli news,