Fri, Apr 26, 2019 01:29



होमपेज › Sangli › जत तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी 212 अर्ज

जत तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी 212 अर्ज

Published On: May 14 2018 1:40AM | Last Updated: May 13 2018 10:16PM



येळवी : वार्ताहर

जत तालुक्यातील  सार्वत्रिक व रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी    अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 212 अर्ज दाखल झाले आहेत.बिळूर, खिलारवाडी, गुलगुंजनाळ, कोंत्याबोबलाद, कोनबगी व उमदी (पोटनिवडणूक) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदाच्या 6 जागेकरिता 25 अर्ज दाखल झाले आहेत.   पोटनिवडणुकीकरिता   70 जागेकरिता 212 अर्ज ग्रामपंचायत निवडणूक विभागास प्राप्त झाले आहेत. कोनबगी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. 7 सदस्याच्या जागेकरिता 6 अर्ज प्राप्त झाल्याने एकंदरित  ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी कोनबगी मधील 1 जागा जातीच्या दाखला वेळेत  प्राप्त न  झाल्याने एक जागा रिक्त राहणार आहे.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने काही गावांत हालचाली सुरू आहेत.  या  निवडणुका पाणी प्रश्न, प्रलंबित विकासकामे ह्या मुद्यावर आधारित प्रचार होणार आहे. तालुकास्तरावरील नेत्यांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुरघोडी होण्याची शक्यता आहे.  गत निवडणुकीत बिळूर, खिलारवाडी, कोतेबोंबलाद या गावातील निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या.

रिक्त ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक 

अंकलगी ,एंकूडी ,धूळकरवाडी ,अमृतवाडी या प्रत्येकी  गावातून सदस्यपदाच्या 1 जागा  रिक्त आहेत. सदस्याच्या 4 जागेकरिता 7 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात एकुंडी, अंकलगी या  गावातून एकच अर्ज आल्याने याठिकाणीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर झाला.