Sun, Jul 21, 2019 16:23
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › २१ कोटींच्या कामांना ३१ मार्च ‘डेडलाईन’

२१ कोटींच्या कामांना ३१ मार्च ‘डेडलाईन’

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 9:57PMसांगली : प्रतिनिधी

जलयुक्त शिवार योजनेतील सन 2016-17 व 2017-18 च्या आराखड्यातील 21 कोटींची कामे दि. 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. 

जलयुक्त शिवार योजना 2016-17 मध्ये छोटे पाटबंधारे विभागाकडून 19.36 कोटी रुपयांची 284 कामे प्रस्तावित केली होती. त्यापैकी 259 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत 25 कामे प्रगतीपथावर आहेत. आजअखेर 11.35 कोटी खर्च झाला आहे. कामांना गती देऊन शिल्लक 4.47 कोटी रुपयांचा निधी मार्च 2018 अखेर खर्च करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. 

जलयुक्त शिवार योजनेतून सन 2017-18 मध्ये छोटे पाटबंधारे विभागाकडून 16.47 कोटी रुपयांची 243 कामे प्रस्तावित केली आहेत. गाव तलाव, पाझर तलाव, दुरुस्तीची 74 कामे, दगडी, सिमेंट, नाला, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्तीची 23 कामे, नाला खोलीकरण, सरळीकरण 108 कामे, पाझर तलाव गाळ काढण्याची 36 कामे, नवीन सिमेंट बंधार्‍यांच्या 2 कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहेत. दहा कामे सुरू असून 3 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी सांगितले.  

कामांसाठी वाळू उपलब्ध नसल्याने क्रश्ड सँडचा 50 टक्के वापर करण्यास अनुमती दिली. छोटेपाटबंधारे विभागाकडे शाखा अभियंत्यांची 22 पदे व उपअभियंत्यांची 7 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.