Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Sangli › निकृष्ट खते, कीटकनाशकेप्रकरणी २१ कोर्ट केसेस

निकृष्ट खते, कीटकनाशकेप्रकरणी २१ कोर्ट केसेस

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 11:48PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागाने वर्षभरात खते, किटकनाशके, बियाणांचे 861 नमुने तपासणीसाठी घेतले होतेे. शंभर नमुन्यांचे तपासणी रिर्पाट अद्याप आलेले नाहीत. प्रयोगशाळा तपासणीत 761 पैकी 29 नमुने अप्रमाणित (फेल) आढळले. 21 प्रकरणी कोर्ट केस दाखल झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून ही माहिती देण्यात आली. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागाकडील अधिकार्‍यांनी दि. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत खतांचे 385 नमुने, बियाणांचे 321 नमुने व किटकनाशकांचे 155 नमुने तपासणीसाठी घेतले होते. खतांचे 28 नमुने प्रयोगशाळा तपासणीमध्ये अप्रमाणित आढळून आले. त्यापैकी 20 नमुने कोर्टकेस पात्र ठरले. संबंधित उत्पादक कंपनी व विक्रेत्याविरोधात कोर्ट केस दाखल झालेली आहे. काही नमुन्यांप्रकरणी संबंधित उत्पादक कंपनी व विक्रेत्यांना  सक्त ताकिद दिली आहे. बियाणाचा एक नमुना अप्रमाणित आढळला असून संबंधित उत्पादक व विक्रेत्यांना ताकिद दिली आहे. किटकनाशकाचा एक  अप्रमाणित नमुना कोर्ट केस पात्र ठरला आहे. 

Tags : sangli news, 21 Court cases, bad manure, insecticide