Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Sangli › सांगली : उसाच्या शेतात युवतीचा लैंगिक अत्याचार करुन खून 

सांगली : उसाच्या शेतात युवतीचा लैंगिक अत्याचार करुन खून 

Published On: Jul 10 2018 8:20PM | Last Updated: Jul 10 2018 8:20PMसंख (तालुका जत) : प्रतिनिधी

जत तालुक्यतील संख येथे एका अठरा वर्षीय युवतीवर अज्ञातांनी तिच्याच राहत्या घराजवळ उसाच्या शेतात तिच्यावतर लैंगिक अत्याचार करुन  त्यानंतर तिचा गळा दाबुन खून केल्याची दुर्दैवी घटना घडली.

सोमवारी संख येथील बाजार असल्याने पिडीतेचे  वडिल बाजार आणण्यासाठी संख गावात गेले होते.  लहान भाऊ हा शेळया चारण्यासाठी गेला होता. त्यामुळे पिडीता आपल्या शेतातील घरी एकटीच होती. शेळया राखण्यासाठी गेलेला लहान भाऊ घरी आल्यानंतर  बहिण घरी नसल्याने  ती वडीलांसबोत बाजारात गेली असावी असे त्याचा समज झाला.  परंतू वडील बाजार करुन एकटेच घरी आल्याने बहिणीची शोधाशोध सुरु केली. ती कुठेच सापडत नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांचा मोठ्या मुलांना घडलेल्या घटनेची माहीती दिली. ते आल्यानंतर रात्रभर बहिणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

शेवटी आज मंगळवार सकाळी ६ च्या दरम्यान उसाच्या शेतात बहिणीच्या चपला आणि घागर दिसून आली नंतर त्यांनी तेथील उसाच्या शेतात शोध घेतला असता बहिण मृत अवस्थेत पडलेली दिसली. त्यांनी याची माहिती तातडीने उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांना दिली. तात्काळ उमदी पोलिस ठाण्याचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी  तपास सुरु केला आहे.